फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:07+5:302021-05-20T04:32:07+5:30
जालना : मागील काही दिवसांपासून फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. जालना जिल्ह्यातही फेसबुकवर बनावट अकाऊंट ...

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान?
जालना : मागील काही दिवसांपासून फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. जालना जिल्ह्यातही फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून पैशांची मागणी केल्याच्या चार तक्रारी सायबर विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
आता प्रत्येक जण फेसबुक वापरत आहे. फेसबुकवर नवीन मित्र बनतात, तर काही जण बनावट अकाऊंट तयार करून फसवणूकदेखील करतात. फेसबुकवर एखाद्या व्यक्तीसोबत ओळख करून घेऊन, हळूहळू मैत्री घट्ट होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी करते. मित्र झाल्यामुळे सदर व्यक्ती पैसेदेखील देते. काही दिवसांनंतर सदर अकाऊंट बंद होते. मग संबंधिताला आपली फसवणूक झाल्याचे समजते. याची तक्रार सायबर विभागाकडे दिली जाते. जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल २६ जणांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर विभागाकडे आल्या आहेत. त्यापैकी यात चार जणांची फेसबुकवरून पैशांची मागणी करून फसवणूक झाली आहे, तर ओटीपी दिल्याने तब्बल १२ जणांची फसवणूक झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घेऊन कोणालाही आपली माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
अशी घ्यावी काळजी
नागरिकांनी फेसबुकवर मित्र बनविताना काळजी घ्यावी. संबंधित व्यक्ती ही पैशांची मागणी करत असेल तर पैसे देऊ नयेत. ओळखीच्या व्यक्तिलाच मित्र बनवावा. तसेच कोणी बँकेच्या नावाखाली फोन करून ओटीपी देण्याची मागणी केली तर त्या व्यक्तिला ओटीपी देऊ नये. काही जण बक्षीस लागल्याच्या नावाखाली पैशांची मागणी करतात. यापासूनही जपून राहावे.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी २६ जणांची फसवणूक झालेली आहे, तर फेसबुकवरून पैशांची मागणी करून चार जणांची फवसणूक झाली. नागरिकांनी सर्तकता बाळगावी. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर विभागाला सांगावे.
- मारुती खेडकर, पोनि. सायबर विभाग
परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर
फेसबुकवरून फसवणूक करणारी व्यक्ती परिचयातील व्यक्तींच्या नावाचा वापर करून बनावट अकाऊंट तयार करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडे वारंवार पैशांची मागणी केले जाते. यासाठी नागरिकांनी ओळखीच्या व्यक्तिनाच फेसबुकवर मित्र बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.