वडीगोद्री (जालना): धुळे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी दुपारी एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची खळबळजनक घटना घडली. वडीगोद्री टी-पॉईंटवरील उड्डाणपुलावर ही आग लागली. सुदैवाने, कारच्या एसीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि चारही प्रवासी तातडीने खाली उतरले. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील एक कुटुंब आपल्या मित्राची कार (MH-11-DD-6081) घेऊन नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांची कार वडीगोद्री उड्डाणपुलावर आली असता, अचानक एसीच्या व्हेंट्समधून धूर निघू लागला.
अग्निशमन दलाची उणीव भासलीधूर दिसताच प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडीतून बाहेर उड्या घेतल्या. ते बाहेर येताच कारने भीषण पेट घेतला. महामार्गावर वडीगोद्री परिसरात अग्निशमन दलाची सुविधा नसल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थांना मर्यादा आल्या. कार पूर्णपणे जळेपर्यंत आग आटोक्यात येऊ शकली नाही. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
Web Summary : A car caught fire on a flyover near Jalna. Passengers escaped unharmed after noticing smoke, but the car was completely destroyed. The incident caused traffic disruption.
Web Summary : जालना के पास एक फ्लाईओवर पर एक कार में आग लग गई। धुंआ देखने के बाद यात्री सुरक्षित निकल गए, लेकिन कार पूरी तरह से जल गई। घटना से यातायात बाधित हो गया।