नळणीवाडी शिवारात १० लाख रुपयांचे गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 19:21 IST2021-12-04T19:19:39+5:302021-12-04T19:21:19+5:30
पोलिसांच्या छाप्या पूर्वी काही गांजा जाळून टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे.

नळणीवाडी शिवारात १० लाख रुपयांचे गांजा जप्त
भोकरदन : तालुक्यातील नळणी वाडी शिवारात भोकरदन पोलिसांनी छापा टाकून सुमारे 10 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
नळणी शिवारातील भावसिंग मारग यांनी शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांना मिळाली. त्यावरून 4 डिसेंबर रोजी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सपोनि रत्नदीप जोगदंड, हसनाबादचे सपोनि संतोष घोडके, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलिस उपनिरीक्षक पाडळे, सानप, पोलिस कर्मचारी गणेश पायघन, जोशी, सतिष जाधव, एकनाथ वाघ, बनसोडे यांच्या पथकाने भावसिंग मारगच्या शेतात छापा टाकला. यावेळी वाळलेला 50 ते 60 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
तसेच छाप्या पूर्वी काही गांजा जाळून टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे. या गांजाची किंमत सुमारे 8 ते 10 लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप पंचनामा करण्याचे काम सुरू असून अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.