पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले
By शिवाजी कदम | Updated: July 26, 2023 18:26 IST2023-07-26T18:26:26+5:302023-07-26T18:26:47+5:30
परतूर शहरातील घटना, तीन आरोपीवर गुन्हा दाखल

पाहुणे म्हणून आले, अन् अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेले
परतूर: शहातील साठे नगरमध्ये लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेल्या तिघा जणांनी चक्क एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर येथील पंचशील नगरमध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलीला आरोपी किशोर कांबळे, संतोष कांबळे, अमोल कांबळे रा.पेडगाव जि. परभणी यांनी २३ जूलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान पंचशील नगरमधून बळजबरीने पळवून नेले. किशोर कांबळे या आरोपीशी लग्न लावण्यासाठी कृत्य केल्याचे इतर आरोपींनी सांगितले आहे.
या प्रकरणी संशयित आरोपींवर परतूर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३६३, ३६६ (अ), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. केंद्रे करत आहेत.