हदगाव शिवारात बिबट्याने पाडला वासराचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:53 IST2018-08-06T00:53:29+5:302018-08-06T00:53:58+5:30
गर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला.

हदगाव शिवारात बिबट्याने पाडला वासराचा फडशा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड/वडीगोद्री : घुंगर्डे हदगाव (ता.अंबड) येथील ॠषिकेश भीमराव मस्के यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले गायीचे वासरू बिबट्याने फरफटत नेत बाजूला असलेल्या शेख अयुब शेख अमीन यांच्या शेतात जाऊन त्याचा फाडशा पाडला.
दुपारनंतर ही बाब शेतकऱ्यांना लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी घडलेल्या प्रकाराबाबतीत वनाधिका-यांना कळविले. वन विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत शेतातील बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले. व गायीच्या वासराचे शवविच्छेदन केले.
घुंगर्डे हदगाव शिवारात बिबट्याचे वास्तव्य असल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये धडकी भरली आहे. तर स्वत:च्या जिवा बरोबरच आपल्या जित्रपाची चिंता शेतकºयांना लागली आहे. बिबट्याच्या भीतीने महिला घराच्या बाहेर पडत नसल्याने शेतीची कामे खोळंबल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही बिबट्याची दहशत कायम असल्याचे वास्तव आहे.