चालकांना बस स्थानकाची ॲलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:46+5:302021-03-17T04:30:46+5:30
फोटो शहागड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या शहागड बस स्थानकाची जणू ॲलर्जीच चालकांना झाली आहे. बहुतांश चालक बस स्थानकात ...

चालकांना बस स्थानकाची ॲलर्जी
फोटो
शहागड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या शहागड बस स्थानकाची जणू ॲलर्जीच चालकांना झाली आहे. बहुतांश चालक बस स्थानकात बस न नेता बाहेरूनच पळवित आहेत. त्यामुळे बस आली रे आली की, वयोवृद्धांसह महिला प्रवाशांना हातात पिशव्या घेऊन नुसती धावपळ करावी लागत आहे.
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी शहागड एक ठिकाण आहे. येथील बस स्थानकात जालना, अंबड, गेवराई, बीड, औरंगाबाद, अंबेजोगाईसह इतर अनेक आगारांच्या बसेस येतात, परंतु सोलापूरकडे जाणारे असोत किंवा औरंगाबाद, जालन्याकडे जाणाऱ्या बसेसचे चालक असोत, बहुतांश चालक महामार्गावरूनच बसेस पुढे हाकत आहेत. अनेक प्रवासी बस स्थानकात बसून बसची वाट पाहतात. महामार्गावरून जाणारी बस दिसली की, बस स्थानकातील प्रवासी हातातील पिशव्या, लहान मुलं घेऊन धावत-पळत बस गाठतात. एखाद्या चालकाने प्रवाशांना नाही पाहिलं, तर प्रवाशांची ही धावपळ काहीच कामाची राहत नाही. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता, शहागड बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी स्वत: चालकांची समजूत काढून वरिष्ठांकडे अहवाल देण्याचा इशारा दिला होता, परंतु याचा काही परिणाम बस चालकांवर झालेला नाही. प्रवाशांची होणारी फरफट कायम आहे. त्यामुळे आता विभाग नियंत्रकांनीच याकडे लक्ष घेऊन कडक पावले उचलावीत, स्थानिक अधिकाऱ्यांंना कारवाईच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
गांधीगिरीनंतरही बेफिकिरी
बस चालकांमुळे होणारी प्रवाशांची गैरसोय पाहता, स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानकात बस न नेणाऱ्या चालकांचा सत्कार करून गांधीगिरी केली होती, परंतु या सत्कारानंतरही बस चालकांची बेफिकिरी कायम आहे.
कॅप्शन : शहागड बसस्थानकाच्या बाहेरून जाणाऱ्या बसेस चालकांना धारेवर धरत, बस स्थानकात घेण्यासाठी कसरत करताना वाहतूक नियंत्रक नासेर खान.
===Photopath===
160321\16jan_1_16032021_15.jpg
===Caption===
कॅप्शन : शहागड बसस्थानकाच्या बाहेरून जाणाऱ्या बसेस चालकांना धारेवर धरत बसस्थानकात घेण्यासाठी कसरत करताना वाहतूक नियंत्रक नासेर खान.