Bus pickup strikes; Four injured, including driver | बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी
बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
महाकाळा (अंकुशनगर) : येडशी - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर राँग साईडने जाणाऱ्या पिकअपला बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी अंकुशनगर येथे घडली.
मंगळवारी सकाळी नागझरी, शहागड, वाळकेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांना पिकअप चालक भास्कर शिंदे यांनी अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सोडले. विद्यार्थ्यांना सोडून पिकअप राँग साईडने शहागडकडे जात होते. त्यावेळीच शहागडकडून येणाºया बीड- औरंगाबाद बस (एमएच.२०.बीएल.२८०१) ने पिकअपला (एमएच.४४.जी.०१७५) समोरून धडक दिली. या अपघातात पिकअप चालक भास्कर शिंदे (४५, रा. नागझरी, ता. गेवराई) यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले आहे. जखमींवर शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. यातील एक जण गंभीर जखमी असून, त्याला बीड येथील रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, बसमध्ये १० ते २० प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Bus pickup strikes; Four injured, including driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.