जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave ) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने वादात आले आहेत. यावेळी त्यांनी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या ( BJP Jan Ashirwad Yatra ) दरम्यान दानवे यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांना 'देवाला सोडलेला वळू', असे संबोधले होते. या वक्तव्याचा जालना कॉंग्रेसने तीव्र निषेध केला आहे. आज सकाळी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे गांधी चमन येथे दहन करत निषेध व्यक्त केला. ( Burning of symbolic statue of Raosaheb Danve by Congress workers)
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींना बैलाची उपमा दिली होती. अतिशय खालच्या शब्दात दानवेंनी राहुल गांधीवर टीका केली होती. त्यामुळं राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. याचाच निषेध म्हणून जालन्यातील गांधी चमन येथे दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
भाजपचे नेते बेताल मोदींनी शासकीय योजनांच्या माहितीसाठी जनआशीर्वाद यात्र काढायला सांगितली. मात्र भाजपचे हे नेते बेताल वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं याचा निषेध म्हणून आज दानवेंचा पुतळा जाळला असल्याचं जालना काँग्रेसने म्हंटले आहे.