शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

औट घटकेची वधू चतुर्भुज; पतीला ३० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 1:24 AM

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्न केलेल्या नवरदेवाला सात दिवस संसार करणाऱ्या पत्नीने ३० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जालना येथे समोर आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कचंदनझिरा : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लग्न केलेल्या नवरदेवाला सात दिवस संसार करणाऱ्या पत्नीने ३० हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार जालना येथे समोर आला आहे. पत्नीची चलबिचल पाहून पती पोलिसांत गेला आणि पत्नी म्हणून जिच्याशी लग्न केले ती व तिचे साथीदार वन-डे लग्नाचा बनाव करून अनेकांना गंडवित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चंदनझिरा (जालना) पोलिसांनी त्या दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. ही घटना तालुक्यातील निधोना येथे १ ते ८ जानेवारी या कालावधीत घडली.निधोना येथील एक व्यक्ती गत अनेक वर्षांपासून लग्नासाठी मुलगी पाहत होता. १ जानेवारी २०२० रोजी राजू पवार नामक व्यक्ती दोन महिला व त्यांच्या मामासह त्या व्यक्तीच्या घरी आले होते. लग्नाचा विषय काढून ‘मुलगी पसंत असेल तर तिच्या आईची तब्येत खराब आहे. वन-डे लग्न करून घ्या. लग्नाचे फोटो तिच्या आईला दाखवायचे आहेत’ अशी विनंती करून लग्न लावले. लग्नानंतर मुलगी काही ना काही कारण काढून घरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे नवरदेवाच्या लक्षात आले. त्यानंतर आईच्या दवाखान्यासाठी पैशाची गरज दाखवून ३० हजार रूपये नातेवाईकांनी नेले. नवरी घरीच होती.सात दिवसांच्या संसारात मुलगी घरातून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होती. ही बाब लक्षात येताच पतीने ८ जानेवारी रोजी चंदनझिरा पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. पोनि शामसुंदर कौठाळे यांनी नवरीला बोलावून घेत महिला कर्मचाऱ्यांमार्फत तिची चौकशी केली. त्यावेळी त्या मुलीने वन-डे लग्नाचा बनाव करून संबंधितांची ३० हजार रूपयांना फसवणूक केल्याची कबुली दिली. या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पथकाने मानवत (जि.परभणी) येथे कारवाई करून कचरूलाल तुलशीराम निलपत्रेवार याच्यासह एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून २० हजार रूपये जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, पोहेकॉ वाघमारे, पोकॉ नंदलाल ठाकूर, महिला कर्मचारी शारदा गायकवाड यांच्या पथकाने केली.मुलीचे झाले होते लग्ननिधोना येथील व्यक्तीसोबत लग्न केलेल्या मुलीचे काही वर्षापूर्वी मुंबई येथील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. तिला दोन मुले आहेत. मात्र, ती पतीसोबत राहत नव्हती. त्यामुळे तिचे तक्रारदाराशी लग्न लावून पैसे घेऊन आम्ही पळून जाणार होतो, अशी माहिती निलपत्रेवार याने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली आहे.खोट्या लग्नाचा बनाव करून फसविणारी टोळीपरभणी जिल्ह्यात खोट्या लग्नाचा बनाव करून फसविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे अटकेतील तिघांविरूध्द इतर कोठे गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पो.नि. शामसुंदर कौठाळे यांनी दिली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न