महत्वाच्या बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:53+5:302020-12-26T04:24:53+5:30
एसएफआयच्या वतीने मनुस्मृतीचे दहन जालना : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मानव मुक्ती दिनानिमित्त शहरातील संजय नगर ...

महत्वाच्या बातम्या
एसएफआयच्या वतीने मनुस्मृतीचे दहन
जालना : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मानव मुक्ती दिनानिमित्त शहरातील संजय नगर येथील सिटु भवन येथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. याप्रसंगी एस.एफ.आय.चे राज्य उपाध्यक्ष अॅड. अनिल मिसाळ, सुभाष मोहिते, रेखा काकडे, राहुल हनवते, राहुल बोबडे, सुमेध जाधव, पवन दांडगे, समीर शेख, सोहेल शेख यांची उपस्थिती होती.
------------------------------
त्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यातून वगळण्याची मागणी
जालना : सध्या जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या कामासाठी दिव्यांग, गंभीर आजारी व्यक्ती व प्रसूती महिला कर्मचाऱ्यांना घेण्यात आले आहे. त्यांना निवडणूक कार्यातून वगळावे, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. दिव्यांग, अपंग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेऊ नये, असे आदेश असतानाही प्रशासनाने कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेतले आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी दिला आहे.
मंठ्यात इंटरनेट सेवा विस्काळीत
मंठा : मंठा तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. तर मोबाईलला नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यामुळे सेतू सुविधा केंद्रासह शासकीय व खासगी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
रामनगर येथे टोपे, गोरंट्याल यांचा सत्कार
जालना : श्री दत्तजयंतीनिमित्त रामनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, याअंतर्गत सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. कीर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर हे सुश्राव्य हरिकीर्तनातून प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त, जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश यज्ञेकर यांनी दिली. तरी या सत्कार सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिकीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यज्ञेकर यांनी केले आहे.