गळफास घेऊन दोघांनी संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:09 IST2018-04-24T01:09:39+5:302018-04-24T01:09:39+5:30

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व खामखेडा येथील दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

Both of them ended their lives by hanging | गळफास घेऊन दोघांनी संपविले जीवन

गळफास घेऊन दोघांनी संपविले जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व खामखेडा येथील दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
भागवत बाबुराव वाघ (२२, रा. गोद्री, बुलडाणा, ह.मु. वालसावंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी नामदेव गवळी यांनी भागवतचा मृतदेह वालसावंगी शिवारातील आदिनाथ नामदेव मोरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिला. त्यांनी पारध पोलिसांना माहिती दिली. बीट जमादार प्रकाश शिनकर, सुरेश डुकरे यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पारध ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अन्य एका घटनेत खामखेडा येथील काकासाहेब सुखदेव नागवे (४०) यांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नागवे यांची पत्नी माहेरी असल्यामुळे घरी कुणीच नव्हते. सकाळी बाहेरून फिरून आल्यानंतर त्यांनी घरातील अँंगलला रूमालाने गळफास घेऊन जीवन संपवले. हा प्रकार गावातील सोमीनाथ सखाराम नागवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजूर पोलिसांना कळविले. राजूर पोलीस चौकीचे जमादार विष्णु बुनगे, कॉन्स्टेबल गणेश मांटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Both of them ended their lives by hanging