अशी ही बनवाबनवी... ग्रामसभा न घेताच बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:30 IST2018-12-10T00:29:59+5:302018-12-10T00:30:12+5:30
घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे.

अशी ही बनवाबनवी... ग्रामसभा न घेताच बनाव
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे.
या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा गेल्या काही महिन्यांमध्ये न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नराजीचा सूर आहे. ग्रामसभा मागील पंधरा आॅगस्ट आणि दोन आॅक्टोबरलाही झालेली नाही. त्यातच ग्रामविकास अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने गावातील समस्या कोणाकडे मांडाव्यात असे निवेदन ग्राम विकास युवा मंच ने दिले आहे
ग्रामसभेत प्रत्येक मतदार व गावातील नागरिकांना बोलण्याचा व ग्रामसभेत रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करण्याचा व त्यावर चर्चा ही ग्रामसभेत होते. ती झालीच नाही.
आॅनलाइन झाली ग्रामसभा
ग्रामसभा होत नसल्याने ग्रामस्थांनी निवेदने देउन पंचायत समितीला मागणी केली होती. मात्र अद्यापही ग्रामसभा झाली नसल्याने ग्रामपंचायतला येणारा १४ व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च होतोय याचा काहीही ताळमेळ नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यात लिंकवर ग्रामसभेचे फोटो अपलोड करणे चालू आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभा झालीच नाही.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी सांगितले की या बाबत माहिती घेऊन गटविकास अधिकाऱ्यांसह जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.