पिठोरी सिरसगाव परिसरात युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:47 IST2018-06-11T00:47:59+5:302018-06-11T00:47:59+5:30
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरातील डाव्या कालव्यात एका अनओळखी युवकाचा (वय २५) धडापासून शीर वेगळे केलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
_201707279.jpg)
पिठोरी सिरसगाव परिसरात युवकाचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव परिसरातील डाव्या कालव्यात एका अनओळखी युवकाचा (वय २५) धडापासून शीर वेगळे केलेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पिठोरी सिरसगाव येथून काही अंतरावर कमी वर्दळ असलेल्या डाव्या कालव्यात एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे शीर धडापासून वेगळे करून येथे अज्ञात लोकांनी आणून टाकले असावे असा कयास पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेह फेकताना कालव्याच्या पायऱ्यावर रक्ताचे जे डाग आढळून आले ते ताजे असल्याने शुक्रवारी पहाटे या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह येथे आणून टाकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहागड-पैठण रस्त्यावर कुरण फाट्यावर युवकाला हातपाय बांधून जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर पुन्हा एका अनोळखी युवकाचा मृतदेह सापडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. ज्या भागात हा मृतदेह आढळून आला तेथे अंबडचे पोलीस विभागीय अधिकारी संतोष वाळके यांनी भेट दिली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वानपथक तेथेच घुटमळल्याने आरोपींचा माग काढण्यात अपयश आले.