तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:08 PM2019-09-28T23:08:02+5:302019-09-28T23:09:18+5:30

भोकरदन तालुक्यातील तडेगाव शिवारातील पूर्णा नदीत गुरूवारी दुपारी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला.

The body was found on the third day | तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील तडेगाव शिवारातील पूर्णा नदीत गुरूवारी दुपारी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला.
तडेगाव येथील पूर्णा नदीपात्रात गुरूवारी दुपारी नासिर नबी सय्यद, कचरू गोफणे हे दोघे वाहून गेले होते. शुक्रवारी सकाळी नासिर सय्यद यांचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दिवसभर कचरू गोफणे यांचा मृतदेह आढळून आला नव्हता. रात्री उशीरा बोरखेडी येथील कोल्हापुरी बंधा-यात मच्छिमार व्यवसाय करणा-या बाबुराव माळी यांनी मृतदेह वाहून जाताना पाहिला. मात्र; पाण्याच्या प्रवाहात त्यांना मृतदेह पकडणे शक्य झाले नाही. त्यांनी तात्काळ ही माहिती तडेगाव येथील सरपंच एम. के. मुगुटराव यांना दिली. परंतु रात्र अधिक झाल्याने ग्रामस्थांनी शोध मोहीम राबविली नाही. शनिवारी सकाळी सरपंच व इतर ग्रामस्थ बोरखेडी येथे गेले. नदीच्या पाण्यात शोध घेत असताना गारखेडा (ता. जाफ्राबाद) हद्दीतील पूर्णा नदीच्या पाण्यावर तंरगणारा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पाण्याची पातळी वाढल्याने लागला शोध
कचरु गोफणे यांचा गत तीन दिवसांपासून शोध सुरु होता. मात्र, पथकाला यश आले नव्हते. त्यांचा मृतदेह गाळात किंवा काटेरी झुडपात अडकलेला होता. माञ; शुक्रवारी पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने प्रवाहात देखील वाढ झाली आणि प्रवाहाच्या जोराने मृतदेह खाली वाहून गेल्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.

Web Title: The body was found on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.