शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; अत्याचार करून खून केल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 14:13 IST

crime news चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका इसमाला डी. मार्टसमोरील आडरानात महिलेचा मृतदेह दिसला.

ठळक मुद्देचौधरीनगर परिसरातील घटना पंच न आल्यामुळे दीड तास मृतदेह जागेवर

जालना : शहरातील चौधरीनगर परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका इसमाला डी. मार्टसमोरील आडरानात महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या अंगावर आणि डोक्यावर वार केल्याचे दिसून आले. महिला विवस्त्र होती. महिलेजवळ सोन्याची पोत, विडी आढळून आली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने घेतले आहेत. दरम्यान, सरकारी पंच न आल्यामुळे पोलिसांना पंचनामा करता आला नाही. जवळपास दोन ते अडीच तास मृतदेह जागेवरच होता. पंच आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. मयत महिलेची ओळख पटली नसून, पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक बागूल यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या.

अत्याचार करून खून केल्याचा संशय; मृतदेहाजवळ सापडले तिकीटसदरील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. डोक्यावर व तोंडावर जखमा दिसून आल्या आहेत. महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने महिलेवर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, महिलेच्या मृतदेहाजवळ बसचे तिकीट सापडले आहे; परंतु तिकिटावरील नावे दिसत नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना