बेपत्ता महिला आणि पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:27 IST2020-07-22T14:18:52+5:302020-07-22T14:27:39+5:30
महिला आणि पाच वर्षांचा मुलगा मंगळवारपासून बेपत्ता होते

बेपत्ता महिला आणि पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
बदनापूर - मंगळवारपासून ( दि. २१ ) बेपत्ता असलेल्या एका महिला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारातील विहिरीत बुधवारी सकाळी आढळून आला. गोदावरी बाळासाहेब नन्नवरे ( २५) व सार्थक बाळासाहेब नन्नवरे (५) अशी मृतांची नावे आहेत.
तालुक्यातील देवपिंपळगाव शिवारातील बाळासाहेब नन्नवरे यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोदावरी नन्नवरे आणि सार्थक नन्नवरे यांचे प्रेत तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच बदनापूरचे पोनि एम. बी. खडेकर, पोउपनि पाटील, पोहेकॉ आय. एम. शेख, नितिन ढिंल्पे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, गोदावरी नन्नवरे आणि सार्थक नन्नवरे हे मंगळवारी (दि. २१) सकाळी ७ वाजेपासून बेपत्ता होते. बालु बबनराव नन्नवरे यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.