जालन्यात स्टील कंपनीतील भट्टीत भीषण स्फोट; सहा कामगार जखमी
By दिपक ढोले | Updated: November 1, 2022 15:22 IST2022-11-01T15:21:18+5:302022-11-01T15:22:16+5:30
या स्फोटात जखमी काही कामगारांवर जालन्यात तर काही कामगारांवर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालन्यात स्टील कंपनीतील भट्टीत भीषण स्फोट; सहा कामगार जखमी
जालना : जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका स्टील कंपनीत मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यात सहा कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या स्फोटात जखमी काही कामगारांवर जालन्यात तर काही कामगारांवर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोखंड वितळणाऱ्या भट्टीत हा स्फोट झाल्याचे कळतंय. दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझिरा पोलिसांनी धाव घेऊन कामगारांना बाहेर काढले आहे. या प्रकरणी अद्यापही चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. हा स्फोट भंयकर असल्याचेही सूत्रांनी सांगितले.