जालन्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू , पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 03:41 PM2021-06-14T15:41:05+5:302021-06-14T15:42:10+5:30

Accident at Jalana अंबड चौफुली ते मंठा चौफुली या रस्त्याचे नुकतेच चौपद्रीकरण झाले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे.

Bizarre accident of three vehicles in Jalna; One killed, five injured | जालन्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू , पाच जखमी

जालन्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू , पाच जखमी

googlenewsNext

जालना :  रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅकला नांदेडकडे जाणारा आयशर धडकला.  तर काही काळानंतर याच ट्रकला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याची  घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ घडली. या अपघातात २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. 

सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नाशिकहून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकचे  (क्र. एम.एच १५ सी.के १५५५) जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ टायर फुटले होते.   त्यामुळे चालक रस्त्याच्या बाजूला टायर बदलत होता. याचवेळी औरंगाबाद येथून नांदेडकडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक (एम.एच. २०.ई.एल १२६५) ने उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.  या अपघातात ट्रकच्या समोरचा भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. सुदैवाने आयशर चालक उत्तम पाटोळे हे किरकोळ जखमी झाले आहेत.  त्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाशिक येथून सिंदखेडा राजा तालुक्यातील खैरखेड्याकडे जाणारी कार क्रमांक (एम.एच.१५.टी.व्ही. १४०४) ही दोन्ही वाहनांना धडकली. या अपघातात किरण संजय धोंडगे (वय २१, रा. खैरखेडा, ता. सिंदखेड राजा) हा जागीच ठार झाला.  यात  विनोद आसाराम खाडे (२८), रेशमा विनोद खाडे (२६), आयुष विनोद काळे (७) किरकोळ जखमी झाले आहेत. तर आर्यन  विनोद खाडे हा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक दाभाडे, राजू साळवे, उमेश साबळे, गजानन काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 
 महिन्याभरात घेतले चार बळी
अंबड चौफुली ते मंठा चौफुली या रस्त्याचे नुकतेच चौपद्रीकरण झाले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. शिवाय, वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवित असल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहे. गेल्या महिन्याभरातच या रस्त्याने चौघांचा बळी घेतला आहे. शिवाय, रविवारी पहाटे एका खाजगी बसने जीपला धडक दिल्याची घटना घडली होती. यात एक महिला जागीच ठार झाली.

Web Title: Bizarre accident of three vehicles in Jalna; One killed, five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.