पिसाळलेल्या कुत्र्याचा नऊ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:35 IST2019-01-21T00:34:47+5:302019-01-21T00:35:04+5:30
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे रविवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने लागोपाठ नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले.

पिसाळलेल्या कुत्र्याचा नऊ जणांना चावा
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे रविवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने लागोपाठ नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात घबराट पसरली असून, कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चावा घेतलेल्यांमध्ये साक्षी टकले, साहेबराव काळूंके, साळूबाई टकले, विठ्ठल इथर, खंडोजी गोंटे, बबन मोरे, बबन पाटील व संगीता काळूंके यांच्या गाईचे वासरू तर नारायण टकले यांची गाय या नऊ जणांना हा कुत्र्याने चावा घेतला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्रा चावल्याने गंभीर जखमी झालेल्या सात जणांना येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविले आहे. तर रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गाय व वासराला उपचार मिळाले नाही.