शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांपासून भोकरदनचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:10 IST

भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

फकीरा देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरण कोरडे पडल्याने शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही प्रशासन कुठल्याच हालचाली करत नाही.यावर्षी पाऊस नसल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे कोरडेठाक पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील २५ गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा बंद असून, पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी नगरपरिषदेकडून शहरालगतच्या विहिरींचा गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, विहिरींमध्ये काही प्रमाणात पाणी येत असल्याने हे पाणी फक्त दोन ते तीन दिवस पुरत आहे. निवडणुकीच्या वेळी मते मागणारे नगरसेवक आता गेले कुठे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.कागदी घोडे नाचविण्याचे काम पंधरा दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाहणीही केली. परंतु, हालचाली झाल्या नाहीत. यासाठी नगरपरिषदेनेही विशेष सभा घेऊन टँकरचा प्रस्ताव तयार करुन पाठविला. मात्र, त्याच्यावरही काहीच काम झाले नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन किमान दिवसातून १० टँकरने भोकरदनला पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.

टॅग्स :Damधरणdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई