२३ हजार ०३१ रुग्णांना सेवेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:47 AM2019-05-26T00:47:36+5:302019-05-26T00:48:21+5:30

आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा वाढ झाली आहे.

Benefits of service to 23 thousand 3131 patients | २३ हजार ०३१ रुग्णांना सेवेचा लाभ

२३ हजार ०३१ रुग्णांना सेवेचा लाभ

Next

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये तब्बल २३ हजार ०३१ रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे. किंबहुना त्यांचे प्राण वाचविण्यात या सेवेचा उपयोग झाला आहे.
२६ जानेवारी २०१४ ला काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १०८ नंबर रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. रस्त्यांवरील अपघात, मारामारी, भाजणे, हृदयाचे आजार, विषबाधा, प्रसूती, विद्युत धक्का, मोठे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि सर्वप्रकारचे रुग्ण अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा याद्वारे मिळतात.
२०१७ -२०१८ यावर्षात १९ हजार ५५३, तर २०१८ -२०१९ यावर्षात २३ हजार ०३१ अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा मिळाली. आता त्यात तब्बल तीन हजारांनी वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे, कोणताही अपघात झाल्यास त्या रुग्णाला तात्काळ कोणत्याही रुग्णालयात घेऊन जाऊन उपचार करणे. तसेच गर्भवतीची प्रसूती कोणत्याही (सरकारी, खाजगी) रुग्णालयात व्हावी, असे सरकारचे धोरण आहे. दरम्यान, घटना घडल्यापासून अवघ्या दहा मिनिटांत १०८ नंबरची रुग्णवाहिका घटनास्थळी येते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही रुग्णवाहिका उपयोगी पडत आहे. दरम्यान, जालना जिल्हाभरात १०८ नंबरच्या १५ रुग्णवाहिका आहे. जिल्ह्यात ३० वैद्यकीय अधिकारी असून, या रुग्णवाहिकेवर ३५ चालक कार्यरत आहेत.
असे चालते काम
रुग्ण अथवा इतर कोणाकडून १०८ क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला, ते शोधले जाते. त्याचवेळी ‘जीपीएस’च्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे हे पाहून तेथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचेल, याकडे लक्ष दिले जाते. दरम्यान, अपघातग्रस्त किंवा आपत्कालीन स्थिती असल्यास नातेवाईक रुग्णाला खाजगी रुग्णालयातही घेऊन जाऊ शकतात.

Web Title: Benefits of service to 23 thousand 3131 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.