धावडा येथील जगदंबा देवी स्वारी उत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:23 IST2018-03-05T00:23:10+5:302018-03-05T00:23:23+5:30

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे होळीच्या पाचव्या दिवसापासून पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सवास प्रारंभ होते. दोनशे वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव यंदाही सोमवारपासून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे.

The beginning of the Jagdamba Devi Swari festival at Dhawda | धावडा येथील जगदंबा देवी स्वारी उत्सवाला सुरुवात

धावडा येथील जगदंबा देवी स्वारी उत्सवाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे होळीच्या पाचव्या दिवसापासून पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सवास प्रारंभ होते. दोनशे वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव यंदाही सोमवारपासून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे.
धावडा येथील भवानी चौकातील आई जगदंबा देवीचे मंदिर असून, ही देवी दक्षिणमुखी आहे. नवसाला पावणारी ही देवी एका रात्रीतून प्रकटल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील स्वारी उत्सवास लेकीबाळींसह राज्याच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. यात मराठवाडा, खान्देश, विदर्भातूनही स्वारी उत्सवाला येणाºया भाविकांची संख्या अधिक असते. सुवासिनी नारळाने, सव्वाशेर गुळ, चांदीचे डोळे, समई, पाळण्याने देवीची ओटी भरतात. ५ मार्च रोजी सुरू होणाºया या स्वारी उत्सवाची सांगता ६ मार्चच्या पहाटे ५ वाजता होणार आहे. उत्सवाची तयारी म्हणून ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वारीनिमित्त निघणारी विविध देवीदेवतांचे सोंग कोणी घ्यायचे, हे ठरविण्यात आले. या स्वारीतील मुख्य आकर्षण असते ते म्हणजे चोराला फाशी देण्याचे सोंग. अंगावर शहारे आणणारे भाल्याने फाशी देण्याचे हे सोंग रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान होते.
देवी उत्सवानिमित्त दोन दिवसात गावात भक्तीमय वातावरण असून, गावाला यात्रेचे स्वरुप आले आहे.
निजामाकडून
मिळायचा खर्च
स्वारीच्या दिवशी महिला घरासमोर सडा, रांगोळी काढतात. गेल्या अनेक वर्र्षांपासून देवीची स्वारी सरपंच बेलाअप्पा पिसोळे हे घेत आहेत. चोराचे सोंग राजू टेंभरे हे घेतात. हे सोंग मोठ्या जिकिरीचे असून त्याला भाल्याने फाशी दिली जाते. ते जिवावर बेतण्यासारखे असते. यापूर्वी हा स्वारी उत्सव आठवडाभर चालत असते. या उत्सवासाठी पूर्वी निजाम राजवटीत हैदराबाद येथून १०० रुपये शासकीय खर्च येई, असे जुन्या जाणकारांनी सांगितले.

 

Web Title: The beginning of the Jagdamba Devi Swari festival at Dhawda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.