साखर उता-यात बागेश्वरी मराठवाड्यात तिस-या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST2021-02-20T05:29:41+5:302021-02-20T05:29:41+5:30

परतूर: साखर उता-यात परतूर येथील मॉ. बागेश्वरी साखर कारखाना मराठवाड्यात तिस-या स्थानी असून, आतापर्यंत कारखान्याने ३ लाख ४२ ...

Bageshwari ranks third in Marathwada in sugar extraction | साखर उता-यात बागेश्वरी मराठवाड्यात तिस-या स्थानी

साखर उता-यात बागेश्वरी मराठवाड्यात तिस-या स्थानी

परतूर: साखर उता-यात परतूर येथील मॉ. बागेश्वरी साखर कारखाना मराठवाड्यात तिस-या स्थानी असून, आतापर्यंत कारखान्याने ३ लाख ४२ हजार मे.टन उसाचे गाळप केल्याची माहिती चेअरमन शिवाजी जाधव यांनी दिली.

यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वत्र शेतक-यांना उस जाईल की, नाही याची चिंता सतावत आहे. मात्र, कारखाना सुरळीत सुरू असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळत आहे. बागेश्वरीने आतापर्यंत ३ लाख ४२ हजार २९० मे.टन उसाचे गाळप केले आहे, तर ३ लाख ६१ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. तसेच कारखान्याचा साखर उतारा १०.६९ टक्के आहे. हा उतारा अव्वल असून, मराठवाडयात तिसºया क्रमांकावर आहे. बागेश्वरी साखर कारखान्याने सुरूवातीपासूनच शेतकºयांचे हित जोपासले आहे. उसाचे क्षेत्र वाढीसाठी स्वत: च्या हमीवर कारखान्याने शेतकºयांना विविध बँकांकडून पाईप-लाईनसाठी कर्ज मिळवून दिले. त्यावेळी एकही बॅक शेतकºयांना कर्ज देण्यास तयार नसतांना आपण स्वत: पुणे येथील कर्नाटका बँकेला कारखान्याच्या हमीवर कर्ज देण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकºयांना पाईपलाईन बरोबरच ड्रीप एरीगेशनसाठी कर्ज मिळाले. शेतकºयांनीही या कर्जाची वेळेत परतफेड केली आहे. कारखान्याने शेतकºयांना सुधारीत उस बेण्याचा पुरवठादेखील उधारीवर केला आहे. येत्या हंगामात कारखाना ६ लाख मे. टन उसाचे अधीक गाळप उद्दिष्ट ठेवत कारखाना सुरळीत सुरू असल्याचेही चेअरमन जाधव यांनी सांगितले.

चौकट

बळीराजा कारखाना मराठवाड्यात प्रथम

मे. श्रध्दा एनर्जी अ‍ॅण्ड ईन्फाप्रोजेक्टचे परतूर येथील बागेश्वरी व पुर्णा तालुक्यातील बळीराजा असे दोन साखर कारखाने आहेत. पूर्णा येथील बळीराजाने आतापर्यंत ४ लाख ५१ हजार ४२० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ८४ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर १०.८३ टक्के साखरेचा उतारा असून, हा कारखाना साखर उताºयात मराठवाड्यात एक क्रमांकावर आहे. दोन्ही कारखान्याचा उतारा अव्वल असल्याने व शेतकºयांना एफआरपी प्रमाणे पैसे मिळत असल्याने उस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

फोटो.

बागेश्वरी कारखाना.

Web Title: Bageshwari ranks third in Marathwada in sugar extraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.