शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

परतीच्या पावसाने शहरातील सखल भागात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 1:00 AM

जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. मात्र, कमी- अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम आहे. शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वसामान्यांना मोठ्या पावसाची अशा कायम आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरीच्या साधारणत: ८० टक्क्यांपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला आहे. मात्र मोठे पाऊस न झाल्याने भोकरदन तालुका वगळता इतर तालुक्यातील प्रकल्पांची तहान कायम असून, अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडेठाक आहेत. शनिवारी सायंकाळी तासभर जालना शहरासह परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. यातून वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागली.परतूर शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. परतूर शहरासह अंबा, कावजवळा, आनंदवाडी, रोहिणा, एकरूखा, कोरेगाव, मापेगाव, शिंगोना, सोंयजना, पाडळी, राहीणा (बु.), बामणी, शेलवडा, वरफळ, चिंचोली, रायपूर, सिरसगाव इ. भागांत या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला मात्र फटका बसणार आहे.भोकरदन तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शेतकरी सध्या सोयाबीन, मका या खरीप पिकाची सोंगणी करीत आहे. मात्र; दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील भोकरदन, पारध, वालसावगी, धावडा, केदारखेड, राजूर, आनवा, आव्हाना, सिपोरा बाजार, दानापूर, जळगाव सपकाळ, नळणी या भागांत पाऊस झाला.या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला आहे. राजूर भागात झालेल्या पावसामुळे कपाशीला जीवदान मिळाले आहे. शिवाय रबी पिकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भागातील चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे राजूरसह परिसरातील पंधरा गावांचा पाणी प्रश्न बिकट आहे. त्यामुळे पंधरा गावांतील नागरिकांना हिवाळ्यातच पाणी समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच दाभाडी व परिसरातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी मोठा पाऊस झाला तर रबी हंगामाला दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, जलसाठे भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.वीज पडून बैलाचा मृत्यूवडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील विठ्ठल रंगनाथ तांगडे हे शनिवारी दुपारी बैलगाडी घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी अचानक वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. यात तांगडे यांचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेने शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.अवजड वाहने चिखलात फसलीवालसावंगी : वालसावंगी- पारध रस्त्याच्या कडेला दोन वाहने चिखलात फसली होती. दोन्ही वाहने जवळजवळ फसल्याने या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहने रस्त्यावरच थांबल्याने या मार्गावरून येणा-या- जाणा-या नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्गwater shortageपाणीकपात