नवोपक्रमशील शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:48+5:302021-09-04T04:35:48+5:30

जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती. वसंतराव ...

Award for Outstanding Teachers | नवोपक्रमशील शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

नवोपक्रमशील शिक्षकांचा पुरस्काराने गौरव

जालना येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत चौधरी, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय येवते, डॉ. सुनीता राठोड, अधिव्याख्याता डॉ. विनोद राख, डॉ. शिवाजी साखरे, गटशिक्षणाधिकारी डॉ. सतीश सातव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राथमिक गटातून बदनापूर तालुक्यातील मेव्हणा जि. प. शाळेतील श्रीकांत ढगे यांना प्रथम, अंबड तालुक्यातील दोदडगाव नीता अरसुळ द्वितीय, बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील भाग्यश्री म्हसे यांना तृतीय, घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील हेमराज रमधम यांना चतुर्थ, परतूर तालुक्यातील दहिफळ भोगांणे येथील पेंटू म्हैसनवड यांना पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच जालना तालुक्यातील घाणेवाडी येथील सोनाली खेरूडकर, भोकरदन तालुक्यातील उमरखेडा शाळेतील ज्ञानेश्वर झगरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षक व मुख्याध्यापक गटातून बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील श्रीमती एम. आर. पाटील यांना प्रथम, भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील तुषार पडूळ यांना द्वितीय, घनसावंगी तालुक्यातील मत्स्योदरी विद्यालय, पिंपरखेड येथील के. एस. घायतिडक यांना तृतीय, जालना तालुक्यातील डग्लस गर्ल्स हायस्कूल येथील कल्पना पाटील यांना चतुर्थ, घनसावंगी तालुक्यातील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, मूर्ती येथील भीमाशंकर शिंदे यांना पाचवे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मंठा तालुक्यातील केंधळी लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील उत्तम धाबले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त झालेल्या ऑनलाइन विज्ञान प्रश्नमंजुषा या स्पर्धेतील गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी विषय साहाय्यक जगन वायाळ, दीपक दराडे, श्रीकृष्ण निहाळ, कैलास तिडके, शेख गफार, सहशिक्षक जयंत कुलकर्णी, साधन व्यक्ती प्रफुल्ल राजे, चंद्रकांत गोल्डे, प्रल्हाद सोलाटे, देवा चित्राल, कैलास गायकवाड, सी. बी. जाधव, करुणा हिवाळे, शीतल मिसाळ, मीरा जगदाळे, एस. यू. गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

फोटो

Web Title: Award for Outstanding Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.