शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

हृदयरोग टाळण्यासाठी व्यायामात सातत्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:39 AM

दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हृदयरोग हा श्रीमंतांचा आजार आहे असे मानले जाते. भारतातल्या चाळिशी ओलांडलेल्या अनेकांना हृदय रोगाचा उपद्रव कधीही होऊ शकतो. म्हणून भारतीयांनी हृदय विकाराच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे. दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाते.प्रत्येकाला रुग्णालयात जाऊन हृदय विकाराची चाचणी करून घेणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे काही सामान्य लक्षणांच्या आधारावर आपण अशी चाचणी करून घेऊ शकतो. आपल्याला छातीत असाह्य वेदना होत असतील आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर ताबडतोब जाऊन चाचणी करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या मनात असलेले काही प्रश्न आम्ही डॉ.रामेश्वर सानप यांच्यासमोर मांडले आहेत. त्यातील काही निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरे.हृदयरोगाची लक्षणे कोणती?सर्वात महत्त्वाचे म्हणजे छातीच्या मध्यभागी दाबल्यासारखे वाटणे किंवा जळजळ होणे हे दुखणे पुढच्या दहा ते तीस मिनीटांत वाढत जाते. चमक येणे, काही सेकदांपर्यंत दुखणे, श्वास घेतल्यावर दुखण्याची तीव्रता वाढत जाणे, ही लक्षणे हृदयरोगाची नाहीत. तरी सुध्दा छातीत कोणत्याही वेदना झाल्यास खबरदारी म्हणून ईसीजी करून घेणे क्रमप्राप्त ठरते.ईसीजीमध्ये हृदयरोगाचे निदान होते काय आणि त्यापूढील तपासण्या कोणत्या?ईसजीमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचे निदान होते. पण, नॉर्मल ईसीजी म्हणजे तुम्हाला हृदयाचा आजार नाही असे नाही. अशा रूग्णांना 2-डी - इको अ‍ॅन्ड स्ट्रेस टेस्ट या पुढील तपासण्या करून घ्याव्यात.अ‍ॅन्जोप्लॅस्टी झालेल्या पेशंटच्या गोळ्या बंद होऊ शकतात का?नाही, अ‍ॅन्जोप्लॅस्टी झालेल्या रूग्णांना जीवनभर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खाव्या लागतात. जर गोळ्या बंद केल्यास त्यांच्या स्टेन्ट बंद होवून रूग्ण दगावण्याची शक्यता असते.ब्लडप्रेशर आणि शुगरच्या गोळ्याने किडनीवर काही परिणाम होतो का?नाही, ब्लडप्रेशर आणि शुगर या रोगांवर गोळ्या उच्च दर्जाच्या तयार आहेत, त्याचा कुठलाही विपरीत परिणाम किडनीवर होत नाही. दरम्यान या गोळ्या नियमित घेतल्याने मधुमेह तसेच ब्लडप्रेशरचा किडनी व मेंदूवर होणारा परिणाम टाळू शकतो.दररोज किती व्यायाम केला पाहिजे?हृदयरोग टाळण्यासाठी प्रत्येकाने किमान ३० मिनिटे वेगाने पायी चालल्यास त्याचा त्यांना चांगला परिणाम दिसून येईल. योग साधना, तसेच धावणे हे देखील शरीराच्या सुदृढतेसाठी गरजेचे आहे. जे धावण्यास व पोहण्यास सक्षम आहेत त्यांनी त्यांच्या परीने झेपतील असे व्यायाम केल्यास त्याचाही लाभ होऊ शकतो.हृदयरोग रूग्णाची थेट अ‍ॅन्जोप्लॅस्टी करता येते का?होय, हार्ट अ‍ॅटॅकच्या रूग्णाचे रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन न देता त्याची अ‍ॅन्जोप्लॅस्टी करता येऊ शकते. प्रायमरी अ‍ॅन्जोप्लॅस्टीमुळे खर्च वाचतो. तसेच हृदयाची हानी कमी होण्यास मदत होते. असे डॉ.सानप म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर