आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:54 AM2019-09-10T00:54:18+5:302019-09-10T00:55:09+5:30

विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Asha workers three hours agitations | आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या

आशा कार्यकर्त्यांचा तीन तास ठिय्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध मागण्यांसाठी आशा - गतप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ३ तास ठिय्या आंदोलन केले.
सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना अटकही केली. विविध मागण्यांचे निवेदन सीईओंना देण्यात आले.
यावेळी सीटूचे राज्य सचिव अण्णा सावंत म्हणाले, सरकारने आशा कर्मचाऱ्यांना जे आश्वासन दिले ते पुर्ण केले नाही. सरकार आशांना अल्प मोबदला देऊन राबून घेत आहे. मोदी मात्र आश्वासन देत फिरत आहेत. लहान मुलांना घेऊन महिला आंदोलनात सामील आहेत. मागील काही दिवसांपासून आशा गतप्रवर्तक संपावर असून, सरकार त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सरकारला आपणच धडा शिकवला पाहिजे म्हणून आपला हा लढा कायम चालू ठेवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनाचे नेतृव कॉ. गोविंद आर्दड यांनी केले. त्यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.
या आंदोलनात कॉ. गोविंद आर्दड, कल्पना आर्दड, अनिता देवकर, कॉ. सुभाष मोहिते, चंद्रकला पोपटे, रेखा तावरे, उज्ज्वला राठोड, सुलोचना लोंढे, मीनाक्षी मोरे, नीता राठोड, सुमित्रा पिंपळे, चंद्रकला कलाल, पूनम पवार, कल्पना मिसाळ, सुनीता कड, वंदना लहाने, अलका हावळे, रेणुका शिरसाठ, मीना भोसले, मंदाकिनी तिनगोटे, वैशाली गवळी, इंदू ससाणे, ज्योती जिने, राजूबाई भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Asha workers three hours agitations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.