व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले
By दिपक ढोले | Updated: September 3, 2022 17:11 IST2022-09-03T17:11:01+5:302022-09-03T17:11:40+5:30
फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली.

व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले
जालना : भामट्याने व्हॉट्सअप क्रमांकावरून एका फायनान्स कंपनीची लिंक पाठवून एकाच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख ५९ हजार १६८ रुपये काढल्याची घटना जालना शहरातील काद्राबाद येथे घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शेख फेरोज शेख अब्दुल (४२) यांचे शहरातील पाणीवेश परिसरात किराणा दुकान आहे. २७ ऑगस्ट रोजी ते दुकानात बसले होते. त्याचवेळी एका भामट्याने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर बजाज फायनान्स कंपनीची लिंक पाठविली. शेख फेरोज यांनी त्यावर क्लिक केेले असता, त्यांच्या एचडीएफसीच्या खात्यातून जवळपास २ लाख ५९ हजार १६८ रुपये ऑनलाईन परस्पर काढण्यात आले.
फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली. या प्रकरणी शेख फेरोज शेख अब्दुल यांच्या फिर्यादीवरून संशयित भामट्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.