शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटलांच्या भेटीला, नेमकी काय चर्चा झाली, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 2:42 PM

मराठा आरक्षणाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.

जालना: जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यात वातावरण तापले आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली असून, आरक्षणाबाबत सकारात्कमकता दर्शवली आहे. यातच आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोफ घेऊन जरांगे यांच्याकडे गेले आहेत. 

मराठा आरक्षणावर उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली असून, खोतकरांनी चर्चेसाठी दार खुलं करा, अशी विनंती जरांगे यांना केली आहे. जरांगे यांनीदेखील चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. पण, तुम्ही जीआर घेऊन या, मगच उपोषण मागे घेतो, असं जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे फोनवरुन बोलणे झाले आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. मला खात्री आहे, मनोज जरांगे यांचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता आहे. आरक्षणविषयक समितीही सकारात्कम निर्णय घेईल. मुख्यमंत्री लवकरच याबाबत माहिती देतील, अशी माहिती खोतकर यांनी दिली.

मराठा आरक्षणविषयक उपसमितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघाल्याची चर्चा आहे. पण नेमकी काय चर्चा झाली, हे लवकरच कळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देतील. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असणार आहे. 

 

टॅग्स :JalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेArjun Khotkarअर्जुन खोतकर