मिरचीचे क्षेत्र दीडपटीने वाढले
By Admin | Updated: May 20, 2014 01:06 IST2014-05-20T00:43:13+5:302014-05-20T01:06:41+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, पारध खुर्द, लेहा, हिसोडा, पद्मावती आदी गावे म्हणजे मिरचीचे आगारच समजले जातात.
मिरचीचे क्षेत्र दीडपटीने वाढले
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील वालसावंगी, पिंपळगाव रेणुकाई, पारध खुर्द, लेहा, हिसोडा, पद्मावती आदी गावे म्हणजे मिरचीचे आगारच समजले जातात. दरवर्षी पारध येथे दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरातसह इतर राज्यातून मिरची व्यापारी हिरव्या, लाल व वाळलेल्या मिरच्या खरेदीसाठी नेतात. हजारो क्ंिवटल मिरचीचा माल खरेदी करुन घेऊन जातात. यावर्षीही परिसरातील शेतकर्यांचा कल मोठ्या प्रमाणात मिरची लागवडीकडे दिसतो आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीला भाव मिळाला. कारण मिरची लागवडीचे क्षेत्र कमी होते. यावर्षी मात्र मागील वर्षी ज्या शेतकर्याने अर्धा एकर मिरची लागवड केली होती, तो शेतकरी दोन एकर मिरची लागवड करण्याच्या तयारीला लागला म्हणजे जवळपास मिरची लागवडीचे क्षेत्र दीड पटीने वाढले. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे भाव मिळेलच याची शाश्वती नाही. त्यातच मजुरांची वानवा मजूरही अव्वाच्वा सव्वा मजुरी वाढवून देतात. मागील वर्षी तर अक्षरश: विदर्भातून २० ते २५ कि. मी. अंतरावरुन मिरची उत्पादक शेतकर्यांनी स्वत:च्या खर्चाने मजूर आणून मिरचीची तोडणी केली. परंतु भाव चांगला मिळाल्यामुळे शेतकर्यांना काही जाणवले नाही. पारध खुर्द येथील शेतकरी रामेश्वर पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षी एका एकरात जवळपास ६ ते ७ लाख रुपये मिरचीचे उत्पन्न काढले. त्यामुळे यावर्षी मी मिरचीचे क्षेत्र वाढविले. परिसरात बर्याच शेतकर्यांनी मिरचीची लागवड करण्यास सुरुवात केली तर कित्येकांचे शेत मिरची लागवडीसाठी तयार आहे. मात्र मिरचीच्या रोपावर मोठ्या प्रमाणात कोकडा रोग पडल्यामुळे रोपांचा तुटवडा पडला आहे. त्यामुळे शेतकरी रोपाच्या शोधात फिरत आहे. दानापूर, भोकरदन, मासरुळ येथील काही शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची रोपांची लागवड केलेली आहे. या शेतकर्याकडे मिरची उत्पादक शेतकरी रांगा लावत आहे व शेतकरी अव्वाच्या सव्वा भाव वसूल करुन स्वत:ची तुंबडी भरत आहे. पुढे शेतकर्यांच्या मिरचीला भाव मिळो न मिळो; त्यांना घेणे देणे नाही. (वार्ताहर) यंदा मोठ्या भावाची प्रतीक्षा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीला भाव मिळाला. कारण मिरची लागवडीचे क्षेत्र कमी होते. यावर्षी मात्र मागील वर्षी ज्या शेतकर्याने अर्धा एकर मिरची लागवड केली होती, तो शेतकरी दोन एकर मिरची लागवड करण्याच्या तयारीला लागला म्हणजे जवळपास मिरची लागवडीचे क्षेत्र दीड पटीने वाढले.