शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१.६३ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:36 IST

पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपयाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा जाफराबाद तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असतानाही उन्हाळ्यात जवळपास ६३ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपयाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे.जाफराबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे मागणी केल्यानुसार जानेवारी ते जून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा मंजुरीसाठी जालना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला. या आराखड्यास पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली असून, जानेवारी ते जून या पहिल्या टप्यात २२ गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून विशेष नळ योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख ६५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.दुसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून महिन्यात ६३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २० गावांत टँकरद्वारे तर १९ गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपये खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईवर काय उपाय- योजना केल्या जातात आणि प्रत्यक्षात किती खर्च करण्यात येतो, हे पाहावे लागणार आहे.दरवर्षी आ. संतोष दानवे हे सर्व विभागाचे अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक येऊन गावनिहाय सविस्तर चर्चा करून आढावा घेतात. मात्र, यावर्षी तसे न होता पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ग्रामसेवकांनी मागणी केल्यानुसार संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे.या गावांतील नळ योजनांची होणार दुरुस्तीतालुक्यातील २२ गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये सातेफळ गावात तात्पुरती पूरक नळ योजना सोडल्यास देऊळझरी, बोरखेडी गायकी, आरदखेडा, गोकुळवाडी, टाकळी, गारखेडा, काळेगाव, खानापूर, वरखेडा फिरंगी, नांदखेडा तांडा, शिराळा, आळंद, माहोरा, वरुड खुर्द, दहिगाव, सावंगी, पापळ, देळेगव्हाण, गोपी या गावांतील योजनांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातJalna z pजालना जिल्हा परिषदfundsनिधी