शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज भरा, २९ तारखेला कोणाला पाठिंबा देयचा हे सांगू: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:04 IST

लढायचं, समविचारींना पाठिंबा अन् पाडायचंही; तिहेरी सूत्रांमुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही चिंता वाढणार

वडीगोद्री (जि.जालना) : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये केली. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार, राखीव जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, जिथे ताकद नसेल अशा ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असल्याचे जो उमेदवार ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देणार, अशी तिहेरी सूत्र सांगणारी भूमिका जरांगे पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या उपस्थितीत जाहीर केली. तसेच निवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल.  ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.

जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे महायुतीची विशेषत: भाजप आणि विरोधी बाकावर बसणाऱ्या मविआच्या नेत्यांचीही चिंता वाढणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल गुन्हे मागे घ्यावेत, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मागील दीड वर्षापासून लढा उभा केला आहे. लाेकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरला. या पार्श्वभूमीवर समाजातील राजकीय, सामाजिक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.

जिथे आपली ताकद आहे, अशा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे. आपल्या ताकदीचे गणित पाहणे गरजेचे आहे. समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळले तर अवघड आहे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. एखादी गाडी चांगली असते परंतु, ड्रायव्हर गाडी नीट चालवित नाही आणि ती झाडावर धडकते तशी स्थिती भाजपची आहे. भाजप चांगली आहे, परंतु चालविणारा चांगला नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. विविध मुद्द्यांवरून जरांगे-पाटील यांनी या बैठकीत फडणवीस यांच्यावर धारदार टीका केली.चौकट

कोणी अर्ज मागे घ्यायचा हे २९ तारखेला सांगूनिवडणुकीसाठी मागणी करणारे अनेक जण आहेत. सर्वांनी अर्ज भरावेत. यादरम्यान सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल आणि २९ तारेखला कोणी अर्ज मागे घ्यायचा हे सांगितलं जाईल. ज्यांची नावे जाहीर होतील त्यांच्या मागे समाजाने राहावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले. राजकारणात जाण्याची इच्छा नसताना त्यांनी मला यात ओढलं आहे. त्यामुळे समाजाची एकजूट ठेवा.

हात वर करून निर्णयया बैठकीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हात वर करून निवडणुकीमध्ये उमेदवार उतरायचे की नाही, असा प्रश्न विचारला आणि समोरच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील