दोन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:37 IST2019-08-24T00:36:33+5:302019-08-24T00:37:01+5:30

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Action on two vehicles | दोन वाहनांवर कारवाई

दोन वाहनांवर कारवाई

राजूर : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भोकरदन तालुक्यातील सिरसगाव भागातील गिरजा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक सुरू होती. बुधवारी दुपारी वाळू घेऊन जाणारा टिप्पर (क्र. एम एच. १५. डी.के. १९९१), हायवा (क्र. एम.एच. २१. बी.एच. १०११) ही वाहने राजूरकडे येत होती. माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाने ही वाहने ताब्यात घेतली. याप्रकरणी गजानन जैस्वाल, गणेश पुंगळे, शेख कलीम शेख रफीक, शरद पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Action on two vehicles