शहागडमध्ये व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST2021-03-05T04:30:50+5:302021-03-05T04:30:50+5:30

शहागड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहागड येथील सहा ...

Action against traders in Shahagad | शहागडमध्ये व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई

शहागडमध्ये व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई

शहागड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहागड येथील सहा व्यापाऱ्यांविरुद्ध शहागड पोलिसांनी मंगळवारी रात्री कारवाई केली.

कोरोनामुळे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परंतु, व्यापारी, नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. त्या वेळी शहागड बसस्थानकासमोर अनेक व्यावसायिक कोरोनातील सूचनांचे उल्लंघन करीत व्यवसाय करीत असल्याचे समोर आले. ही बाब पाहताच बल्लाळ यांनी शहेजाद बागवान, मुजीप शेख, शिवनाथ टोपे, विजय ठोंबरे, विलास तुरुकमरे, गणेश सावंत आदींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या वेळी गोपनीय शाखेचे महेश तोटे व इतरांची उपस्थिती होती.

Web Title: Action against traders in Shahagad