बनावट उत्पादनाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:01+5:302021-02-14T04:29:01+5:30
शहरातील नवीन मोंढा भागातील एका वाहनातून अवैधरीत्या एका नामांकित कंपनीचे नाव असलेल्या बनावट उत्पादनाची वाहतूक होत असल्याची माहिती ...

बनावट उत्पादनाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
शहरातील नवीन मोंढा भागातील एका वाहनातून अवैधरीत्या एका नामांकित कंपनीचे नाव असलेल्या बनावट उत्पादनाची वाहतूक होत असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी नवीन मोंढ्याच्या गेटवर एका वाहनावर कारवाई केली. चालक अक्षय मारोती कांबळे (रा. शास्त्रीनगर, जालना) याच्याकडे उत्पादनाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाहनासह मुद्देमाल चंदनझिरा ठाण्यात नेण्यात आला. तेथे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वाहनातील माल मुंबई येथून आल्याची व तो बनावट असल्याची कबुली कांबळे याने दिली. पोलिसांनी वाहनासह इतर साहित्य असा पाच लाख ३२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहायक पोलीस निरीक्षक साळवे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, हवालदार विलास आटोळे, नंदलाल ठाकूर, अजय फोके, चंद्रकांत माळी, अनिल काळे यांच्या पथकाने केली.
फोटो