जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:43 AM2019-12-24T00:43:31+5:302019-12-24T00:43:52+5:30

जालना : पैशावर जुगार खेळणा-या १६ जणांविरूध्द मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी भाटेपुरी शिवारात करण्यात आली ...

Action against 3 gamblers | जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द कारवाई

जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरूध्द कारवाई

Next

जालना : पैशावर जुगार खेळणा-या १६ जणांविरूध्द मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी भाटेपुरी शिवारात करण्यात आली असून, यावेळी रोख रक्कम, जुगाराच्या साहित्यासह २ लाख १२ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भाटेपुरी शिवारात पैशावर जुगार सुरू असल्याची माहिती मौजपुरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर, सपोनि फुलचंद मेंगडे यांनी सोमवारी सायंकाळी कारवाई केली. यावेळी विलास सावंत, विजयसिंग चुगडे, शिवाजी नवले, रफीक शेख, विठ्ठल भायेती, प्रभाकर खलपटे, अंकुश उदभडे, संदीप घोडे, दीपक कुटे, रामेश्वर खैरे यांच्यासह १६ जणांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी रोख १ लाख ८ हजार ४३० रूपये, १६ मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १२ हजार ३४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Action against 3 gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.