शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ बसेसवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

आरटीओ विभागाची मोहीम; तीन लाखांचा दंड वसूल जालना : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ खासगी बसेसवर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शुक्रवारी ...

आरटीओ विभागाची मोहीम; तीन लाखांचा दंड वसूल

जालना : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४७ खासगी बसेसवर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शुक्रवारी रात्री कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.

राज्यात होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रादेशिक परिवहन विभागाला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शुक्रवारी रात्री उशिरा जालना-औरंगाबाद रस्त्यावरील नागेवाडी टोल नाका येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली. विना परवाना अथवा परवान्याच्या अटीचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनाचा कर नसणे, रिप्लेकटर, इंडीकेटर, टेल लाईट, वायपर नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे व जादा भाडे आकारणे, आदी बाबींची तपासणी करण्यात आली. यात ४७ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे, तर दोन बसेस ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्याकडून तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी विजय काळे, मोटार वाहन निरीक्षक उदय साळुंखे, नितीन पाटील, वाहन चालक आसाराम घुले, दीपक डोळस, लक्ष्मण सरोदे यांनी केली.

कोट

वरिष्ठांच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ४७ बसेसवर कारवाई करून ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन बसेस ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

------------------