२० रोडरोमिओंवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:07 IST2018-12-29T00:06:35+5:302018-12-29T00:07:12+5:30
शहरात वाढत असलेल्या रोडरोमिओंगिरीवर पोलिसांनी कारवाई करत २० जणांची धरपकड केली. त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

२० रोडरोमिओंवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात वाढत असलेल्या रोडरोमिओंगिरीवर पोलिसांनी कारवाई करत २० जणांची धरपकड केली. त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
शहरातील कॉलेज कॅम्पसमध्ये रोडरोमिआेंगिरी वाढल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. जेईएस कॉलेज, मत्स्योदरी कॉलेज, सरस्वती विद्यालय यासह आदी कॉलेज समोर अनेकजण गाड्या लावून घोळका करून उभे राहत असत. येणाºया जाणाºया मुलींना टॉन्ट मारणे, त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चित्र विचित्र आवाज काढणे, धूम स्टाईलने दुचाकी पळवणे, जोर जोरात हसणे, जोक सांगणे असे प्रकार सुरु होते. त्यामुळे मुलींना आणि नागरिकांना नाहक त्रास होत असे.
या रोडरोमिओंविरुध्द गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी कारवाई करत २० मुलांना ताब्यात घेतले. प्रत्येकाच्या पालकांना बोलावून त्यांना समज दिली. त्यांच्याकडून जवळपास चार हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.