लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे शेतीच्या वादातून रविवारी दुपारी एकाला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना पकडण्यासाठी गोदीचे पोलीस पथक गेले होते. मात्र ते सर्व जण फरार झाल्याचे दिसून आले.रविवारी दुपारी मुद्रेगाव येथे शेतीच्या जुन्या वादातून बाबूराव भगवान राऊत यांना लाठ्याकाठ्यासह लोखंडी टॉमीने मारहाण करण्यात आली होती. त्यातच त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताचे वडील भगवान राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी गोविंद राऊत, गोपाल राऊत, संभाजी राऊत, शिवाजी राऊत, योगेश राऊत, पन्नालाल राऊत, तुकाराम शेजूळ ( बोरगाव, ता. माजलगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस रविवारी तसेच सोमवारी देखील मुद्रेगाव येथे गेले होते, परंतु हे आरोपी तेथून पसार झाले होते.दरम्यान, मयत बाबूराव राऊत यांच्या मृतदेहावर सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘त्या’ खून प्रकरणातील आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:58 IST