शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

झाले मरण स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:28 IST

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे फलक सर्वत्र दिसतात. परंतु ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल ६०३ अपघात झाले असून यामध्ये ३२९ ...

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे फलक सर्वत्र दिसतात. परंतु ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल ६०३ अपघात झाले असून यामध्ये ३२९ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तर ५७३ लोक गंभीर जखमी झाले आहेत. सरासरीनुसार जिल्ह्यात दिवसाला एक अपघात, तर ३ दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई हे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आकडेवारीवरून ‘मरण झाले स्वस्त’ म्हणण्याची वेळ आली आहे.ध्या जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. जिल्ह्यातून पाच राज्य महामार्ग जातात. यामध्ये औरंगाबाद-जालना, जालना -नांदेड, जालना - देऊळगावराजा, जालना-सिंदखेड राजा, जालना - अंबड यांचा समावेश आहे. यातील जालना-अंबड महामार्ग खूपच अरूंद आहे. त्यातच या मार्गावरून ट्रकसारख्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर कोंडीसह अपघात जास्त होतात. याच मार्गावर जास्त अपघाताची नोंद असल्याचेही सूत्रां कडून सांगण्यात आले.दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहन धारकांपर्यंत जनजागृती खºया अर्थाने पोहोचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे.अंबड रोडवर सर्वाधिक अपघातगेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरण न झाल्यामुळे अंबड रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होतात. रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने धावतात. त्यातच दुहेरी वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राणही गमावावे लागले. या रस्त्याच्या चौपदरी करणाची अनेक दिवसापासून मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही.रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातजालना शहरातील मुख्ये रस्ते काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आले आहेत. हे रस्ते झाल्यामुळे अपघात कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अद्यापही अपघात कमी झाले नसून छोटे-मोठे अपघात घडतच आहेत. शहरात वाहतुकींच्या नियमाचे पालन न करणे, सिग्नल नसणे ही कारणेही वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत आहेत.भरधाव वेगही कारणीभूत‘अति घाई संकटात नेई’ असे घोषफलक रस्त्याच्या कडेला दिसतात. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. भरधाव वाहन असताना अचानक कुत्रे-मांजर अन्य कोणीतरी आडवे येते आणि अचानक ब्रेक दाबल्यानंतर वाहन उलटून जीव जातो. असे अपघात झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कोट्यवधी रूपये खर्चूनही रस्ते ‘जैसे थे’जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्ते जैसे थे च आहेत. अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळेच अपघात होत असल्याचे समोर आले असून, अशा अपघातास बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे सदरील परिस्थितीवरुन दिसते.अल्पवयीन वाहन चालक सुसाटजिल्हाभरात अल्पवयीन वाहन चालकांचा सुळसुळाट आहे. परवाना नसतानाही भरधाव वाहने चालवितात. वाहन चालविण्यासाठी त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता नसते. पाल्यांच्या हट्टापायी त्यांच्या हाती वाहनाची चावी दिली जाते. आणि हेच त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी