परतूर-वाटूर रोडवर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:12 AM2019-02-10T00:12:27+5:302019-02-10T00:12:54+5:30

परतूर - वाटूर रोडवर पिंपरखेडा पाटीवर एका भरधाव इंडिकाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले

Accident on Partur- Watur road | परतूर-वाटूर रोडवर अपघात

परतूर-वाटूर रोडवर अपघात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर - वाटूर रोडवर पिंपरखेडा पाटीवर एका भरधाव इंडिकाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालन्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
वाटूरहून परतूरकडे इंडिका क्रमांक (एम एच. ४९ बी.५१४१) ही भरधाव वेगाने जात असतांना पिंपरखेडा पाटीजवळ दुचाकी (क्र. एम. एच. बीजे. ९९७४) हिला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भागवत चिंचाणे आणि पिंटू मुळे हे गंभीर जखमी झाले.
इंडिकामधील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, अपघात जखमी झालेल्या दुचाकी स्वारांवर जालना येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. या अपघाताची पोलिसांत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.
यातील जखमी पिंटू मुळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा दि. ११ रोज सोमवारी होता, यामुळे लग्नातील भाजीसाठी हे मोटार सायकलस्वार परतूरला वांगे व इतर भाजीपाला आणण्यासाठी येत होते. या अपघातानंतर भाजी पाला आणण्यासाठीचे पोते या इतरत्र विखुरले होते. ऐन लग्नाच्या घाईतच वधू पित्यावर हे संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
परतूर वाटूर रोडचे रूंदीकरणा बरोबरच सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. ज्या भागात रोडचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागात वाहनांचा वेग वाढण्या बरोबरच अपघातही होत आहेत. हा अपघातही असाच चांगल्या रस्त्यावर घडला आहे.

Web Title: Accident on Partur- Watur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.