५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:11 AM2020-03-03T00:11:18+5:302020-03-03T00:12:20+5:30

५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला

Aadhaar certification done by 3 thousand farmers | ५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण

५० हजार शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द झालेल्या दोन याद्यांमध्ये १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पैकी तब्बल ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे. तर यादीतील आधार क्रमांक चुकल्याबाबत ६७४ शेतक-यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.
महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या पहिल्या यादीत टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील ११०२ शेतक-यांची नावे होती. तर दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांची नावे समाविष्ठ करण्यात आली होती. याद्या जाहीर झाल्यापासून आजवर ५० हजार ५७५ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. तर ६७५ शेतक-यांनी आधार क्रमांकाबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत. पैकी राष्ट्रीयीकृत बँकेतील ५४३ शतक-यांचे ४ कोटी ९१ लाख रूपये कर्जखात्यात जमा झाले आहेत.
शासनाच्या दोन्ही याद्यांमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या ८१ हजार ८१६ शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण होणे अद्याप बाकी आहे. या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण वेळेत व्हावे, यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. तर शेतक-यांकडून दाखल होणा-या तक्रारींचे तात्काळ निरसण करण्याची प्रक्रियाही केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इतर लाभार्थ्यांची यादी येण्याची शक्यता आहे.

Web Title: Aadhaar certification done by 3 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.