पोहायला गेलेला तरुण गोदावरी नदीत बुडाला; दोन तासानंतर मृतदेह हाती लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:32 IST2025-05-31T13:29:16+5:302025-05-31T13:32:32+5:30

गोदावरी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; डोमलगाव येथील घटना

A young man who went for a swim drowned in the Godavari river; his body was found two hours later | पोहायला गेलेला तरुण गोदावरी नदीत बुडाला; दोन तासानंतर मृतदेह हाती लागला

पोहायला गेलेला तरुण गोदावरी नदीत बुडाला; दोन तासानंतर मृतदेह हाती लागला

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :
अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदीत पोहत होते. यावेळी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. ज्ञानेश्वर बाबासाहेब खराद ( १९ रा डोमलगाव ता. अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

गावातील तरुण बुडाल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्राकडे धाव घेतली. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पटीचे पोहणारे ग्रामस्थ व मासेमार गोदावरी पात्रात उतरले. तब्बल दोन तासांच्या शोध कार्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: A young man who went for a swim drowned in the Godavari river; his body was found two hours later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.