जालना जिल्ह्यात ९३५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:34 IST2018-11-28T00:32:50+5:302018-11-28T00:34:14+5:30
जालना जिल्ह्यात पीककर्ज वाटपासाठीच्या एक हजार २०० कोटीच्या तुलनेत ९३५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सागिंतले.

जालना जिल्ह्यात ९३५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात पीककर्ज वाटपासाठीच्या एक हजार २०० कोटीच्या तुलनेत ९३५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सागिंतले. एकूणच शेतकरी आणि बँक अधिका-यांना या बैठकीत समोरासमोर बोलावण्यात आल्याने शेतक-यांनी त्यांना येणा-या अडचणी मांडल्या. यावेळी अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच दूध डेअरी संदर्भातील कर्ज प्रकरणांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
जालना जिल्ह्यात एकूण दीड लाख शेतक-यांना ९३५ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यातील शेतक-यांना जवळपास ९०० कोटी रूपयांपर्यंतची कर्जमाफी मिळाल्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच यंदा पीककर्ज वाटपासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा सहकार निबंधक तसेच अग्रणी बँकेचे अधिकारी इलमकर, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, तालुका पातळीवरील तालुका उपनिबंधकांनी तालुकानिहाय दर आठवड्याला शेतकरी आणि बँक अधिका-यांचे संयुक्त मेळावे घेऊन आलेल्या प्रस्तावांचा निपटारा केल्यानेच हे शक्य झाल्याचे यावेळी एन.व्ही. आघाव यांनी सांगितले.
या बैठकीत उपस्थित शेतक-यांनी महाराष्ट्र बँकेसह अन्य बँकांकडून सकारात्मक वागणूक मिळत नसल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बँक अधिका-यांना दिले.