क्रेडिट सोसायटीतून ९ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST2021-05-27T04:31:54+5:302021-05-27T04:31:54+5:30

परतूर शहरातील क्रेडिट अ‍ॅक्सिस ग्रामीण पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा शुभम उत्तम वाघ रा. जवखेडा ता. भोकरदन याने ...

9 lakh lampas from credit society | क्रेडिट सोसायटीतून ९ लाख लंपास

क्रेडिट सोसायटीतून ९ लाख लंपास

परतूर शहरातील क्रेडिट अ‍ॅक्सिस ग्रामीण पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा शुभम उत्तम वाघ रा. जवखेडा ता. भोकरदन याने तिजोरीच्या चाव्या चोरून घेत. ही घटना तिजोरीतील १३ लाख २८ हजार रूपयांपैकी नऊ लाख रूपये लांबविले. ही घटना २१ ते २४ मे दरम्यान घडली. ही चोरलेली ९ लाख १५ हजार ९८६ रूपयांची रक्कम वाघ याने जालना तालुक्यातील विरेगाव येथील एका महीलेजवजळ ठेवले. यातील ८ लाख १२ हजार ४० रुपये सदरील महिलेकडून पोलिसांनी हस्तगत केले आहेत. असे असतानाच या चोरी प्रकरणातील १ लाख ३९४ रूपये गायब केले आहेत. याप्रकरणी पतसंस्थेतील वरिष्ठ अधिकारी मुंजाभाऊ खापरे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील बोडखे हे करीत आहेत.

Web Title: 9 lakh lampas from credit society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.