७५ वर्षीय वृद्धेचा बलात्कार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:04 IST2018-07-17T01:04:14+5:302018-07-17T01:04:44+5:30

गावात एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय वृध्देवर बलात्कार करुन खून केल्याची घटना सोमवारी बदनापूर तालुक्यातील राजेवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी रतनसिंग महाजन गुसिंगे (३०) या संशयितास पोलिसांनी अटक केली.

75-year-old lady murdered after rape | ७५ वर्षीय वृद्धेचा बलात्कार करून खून

७५ वर्षीय वृद्धेचा बलात्कार करून खून

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : गावात एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय वृध्देवर बलात्कार करुन खून केल्याची घटना सोमवारी बदनापूर तालुक्यातील राजेवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी रतनसिंग महाजन गुसिंगे (३०) या संशयितास पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजेवाडी येथे एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय महिलेच्या रतनसिंग गुसिंगे याने प्रवेश करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असावा असा कयास पोलिसांनी प्रथमदर्शनी लावला आहे. महिलेने प्रतिकार केल्यानेच तिचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, या प्रकरणी राजेवाडी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष कंपूसिंग गुसिंगे यांच्या तक्रारीवरून रतनसिंग गुसिंगे याच्याविरूध्द बलात्कार करून खून केल्या प्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक खनाळ यांनी दिली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्याचेही खनाळ म्हणाले.

Web Title: 75-year-old lady murdered after rape