६२ शेतकरी करणार मत्स्यपालनाचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:32 IST2019-09-08T00:32:41+5:302019-09-08T00:32:55+5:30
६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यात आले.

६२ शेतकरी करणार मत्स्यपालनाचा व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवेळी पडणारा पाऊस. निसर्गाची शेतीवर होणारी अवकृपा. यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक विस्कटलेली घडी नीट बसणार नाही. हीच बाब हेरून जिल्हा कृषी कार्यालायातील कृषी तंत्रणान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील ६२ शेतकऱ्यांना शेततळ््यातील मत्स्यपालनाचे प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील कोकण येथे नुकतेच देण्यात
आले.
हे प्रशिक्षण आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक अनिरुद्ध मगर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २३ आॅगस्ट व २६ ते २८ आॅगस्ट या दोन टप्प्यामध्ये देण्यात आले. यात जिल्ह्यातील ६२ शेतकरी व ३ आत्माचे कर्मचारी उपस्थित होते. यात गोड्या पाण्यात मत्स्यपालन कसे करावे, माशांची काळजी कशी घ्यावी, मत्स्य खाद्य तयार करणे, मत्स्य बीज बनविणे, मास्यांवर येणा-या विविध रोगांची ओळख करून त्यावर उपाय कशे करावेत आदी. विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात
आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, धैर्यशील पाटील, सचिन राठोड आदींनी प्रयत्न केले.
शेतक-यांनी बांधली ८२५९ शेततळी
जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी, परतूर आणि जाफराबाद या तालुक्यातील शेतक-यांनी मागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत ८२५९ शेततळी बांधली आहेत. यातील असंख्य शेततळ््यांचे अस्तरीकरण देखील झालेले आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेततळ््यांत प्रशिक्षणार्थींना आता कटला, मृगल, रोहू आदी माशांचे मस्यपालन करता येणार आहे. परिणामी शेतक-यांच्या उत्पनात दुपटीने वाढ होण्यास मदत होणार आहे.