बाधितांमध्ये जालना शहरातील १२६, बाबर पोखरी २, बाजी उम्रद १, भाटेपुरी १, चंदनझिरा १२, धारा ३, दुधनाकाळेगाव १, डुकरी १, गोंदेगाव १, हिस्वन १, हिवरा १, हातवन १, खनेपुरी ३, माळीपिंपळगाव ५, नाव्हा १, नेर ५, निधोना १, पाचनवडगाव १, पिंपळगाव १, रेवगाव १, सामनगाव २, सिंधीकाळेगाव १, टाकरवन १, वरखेडा १ वरुड ४, विरेगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा तालुक्यातील शहर २२, आकणी ३, अंभोरा शेळके १, अंभोडा कदम १, देवगाव १, देवठाणा ५, गुलखांड १, हेलस १, खोराड सावंगी ८, कोठा २, माकतोंडी १, मालेगाव १, नायगाव १, नानसी २, पाटोदा ५, पांगरा ४, पांगरी ४, पोखरी १, रामतीर्थ १, रानमाला येथील एकास कोरोनाची लागण झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर ६ , आष्टी १, असनगाव १, घोंसी १, लि. पिंपरी १, अकोली ४, आरडा १, नांद्रा १०, पोखरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर २०, अंतरवाली १, अंतरवाली टेंभी १, भाडळी २, बोडखा १, बोलेगाव १, चित्रवडगाव १, दैठणा १, ढाकेफळ २, देवडे हदगाव २, धामनगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे.
५२ हजार रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५७ हजार ४२५ वर गेली असून, त्यातील ९४९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर ५२ हजार २५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. वाढणारी रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी मास्क वापरासह प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.