ऑनलाइन फसवणुक होताच तत्काळ तक्रार दिली, २४ तासांत ५३ हजार रुपये मिळाले परत
By दिपक ढोले | Updated: May 31, 2023 18:38 IST2023-05-31T18:37:22+5:302023-05-31T18:38:55+5:30
क्रेडिट कार्डची लिमीट वाढवून देतो, असे म्हणून झाली होती फसवणूक

ऑनलाइन फसवणुक होताच तत्काळ तक्रार दिली, २४ तासांत ५३ हजार रुपये मिळाले परत
जालना : क्रेडिट कार्डची लिमीट वाढवून देतो, असे म्हणून एकाची ५३ हजार ६७८ फसवणूक झाली होती. सायबर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सदरील रक्कम परत मिळविले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
क्रेडिट कार्डची लिमीट वाढवून देतो, असे म्हणून जालना येथील अमितकुमार लोखंडे यांची मंगळवारी ५३ हजार ६७८ रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी तात्काळ याची माहिती सायबर पोलिसांना दिली. सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण केले. सदरची माहिती विविध पोर्टलकडून प्राप्त करून घेऊन तक्रारदाराची रक्कम पुढे वळविण्यात आलेल्या वॅलेटला तात्काळ पत्रव्यवहार केला. संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना रक्कम फ्रीज करून परत करण्यास कळविले. सतत पाठपुरावा केल्यामुळे २४ तासांत ५३ हजार ६७८ रुपये परत मिळविले आहेत. तक्रारदाराला तत्काळ पैसे मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे, सुनील पाटोळे यांनी केली आहे.