शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ४२९ जणांचे जुळले नव्याने संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:21 IST

महिला तक्रार निवारण केंद्रात गेलेल्या ६८० जोडप्यांपैकी ४२९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरातील किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून पती-पत्नी घटस्फोटापर्यंत जातात; परंतु हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात गेलेल्या ६८० जोडप्यांपैकी ४२९ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. मोबाईलवरील संभाषण मॅसेज, संशय अशी विविध किरकोळ कारणे, घरातील पती-पत्नीच्या वादासाठी कारणीभूत ठरत आहेत.१९९६ पासून जालना पोलिसांच्या वतीने महिला तक्रार निवारण केंद्र तालुका जालना पोलीस ठाण्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये सुरु झाले. सुरुवातीला जनजागृती व माहितीचा अभाव असल्याने तक्रारींची संख्या खूपच कमी होती. १९९६ साली ३५ अर्ज आले होते. पैकी २६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात तक्रार निवारण केंद्राला यश आले. त्यानंतर ही कामगिरी वृद्धिंगत होत गेली. एकाने दुसऱ्याला, दुस-याने तिस-याला सांगत गेल्याने आज तक्रारींचा आकडा ६०० वर गेला आहे. हाच धागा पकडून पती-पत्नींमध्ये कोणत्या कारणावरुन वाद होतात याचा आढावा शनिवारी ‘लोकमत’ने घेतला. यावेळी संशय, मोबाईल व ईगो या कारणावरुन सर्वात जास्त भांडणे होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी दोघांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन करीत पुढे निर्माण होणा-या दुष्परिणामांची जाणीव करुन दिली जाते. या समुपदेशनामुळे २०१८ या वर्षात तब्बल ४२९ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात यश मिळवले आहे. हा आकडा कौतूकास्पद असल्याचे सांगण्यात आले.असे होते समुपदेशनसुरुवातीला पीडितेची तक्रार तिच्या हस्ताक्षरात घेतली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला महिला तक्रार निवारण केंद्रातून संबंधित पोलीस ठाण्यातर्फे नोटीस पाठविली जाते. ठरलेल्या तारखेस हजर राहण्यास सांगितले जाते. दोघांनाही समोरासमोर आणून त्यांची अडचण जाणून घेतली जाते. त्यानंतर त्यावर मार्ग काढण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले जाते.वाईट परिणामांची जाणीव करुन दिली जाते. वारंवार तारीख देऊन त्यांचे मनपरितर्वन करण्याचा प्रयत्न होतो. तरीही प्रकरण मिटले नाही तरी संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले जाते.

टॅग्स :Divorceघटस्फोटmarriageलग्नPoliceपोलिसFamilyपरिवार